breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तान निवडणूक प्रचारादरम्यान नेत्यांवर दहशतवादी हल्ल्यांचा धोका

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान निवडणूक प्रचारादरम्यान इमरान खानसह अनेक राजकीय नेत्यांवर दहशतवाद्यांकडून हल्ले होण्याचा धोका आहे. पकिस्तानमधील राष्ट्रीय दहशतवादविरोधी संस्था एनएसीटीए ने ही धोक्‍याची सूचना दिली आहे. 25 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठीच्या प्रचार रॅलीदरम्यान दहशतवादी या नेत्यांना लक्ष्य बनवू शकतात, असे सांगण्यात आले आहे. केंद्रीय आणि प्रांतीय मंत्रालयांसह कायदा अंमल बजावणी संस्थांना दक्षतेचे 12 इशारे पाठवण्यात आल्याचे एनएसीटीए ने सांगितले आहे.

पीपीपी (पाकिस्तान पीपल्स पार्टी) आणि पीएमएल-एन(पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज) सह राजकीय पक्ष आणि सहा नेत्यांना लक्ष्य बनवले जाण्याची शक्‍यता पाकिस्तानी मीडियाने एजन्सीच्या हवाल्याने वर्तवली आहे. या सहा नेत्यांमध्ये पाकिस्तान तहरीक ए इन्साफ चे इमरान खान, अवामी नॅशनल पार्टीचे असफंदयार वली आणि अमीर हैदर होती, कौमी वतन पार्टीचे आफताब शेरपाऊ, जमियत उलेमा ए इस्लाम फजल चे अक्रम खान दुर्रानी आणि हाफिझ सईदचा पुत्र तलहा सईद यांचा समावेश असल्याचे एनएसीटीएचे संचालक ओबेद फारूख यांनी सांगितले आहे.

एनएबी (नॅशनल अकाउंटॅबिलिटी ब्यूरो) ला एजन्सीच्या मुख्यालयावर विस्फोटकांनी भरलेल्या वाहनाने हल्ला करण्याच्या धमकीचे पत्र मिळाल्याची माहिती इस्लामाबादचे पोलीस उप महानिरीक्षक वकार अहमद चौहान यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button