पिंपरी / चिंचवड

प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे निगडी स्मशानभूमीत मृतांची हेळसांड

पिंपरी |महाईन्यूज|

निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत कोरोना बाधित मृतदेहांवर महापालिकेतर्फे मोफत अंत्यसंस्कार (Cremated) केले जातात. एका मृतदेहामागे आठ हजार रुपये खर्च महापालिका उचलते, तरीही स्मशानभूमीत मृतदेह अर्धवट जळत असल्याची धक्कादायक माहिती (Information) समोर आली आहे. निकृष्ट दर्जाची लाकडे आणि बहुतांश वेळा लाकडाचा कमी वापर केल्याने योग्य प्रकारे राख होत नसल्याचे आढळले आहे. यातूनच भटकी कुत्री (Dog) कोरोनाबाधित मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे अंगावर शहारे आणणारे दृश्य निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत (Amardham Cemetery) दिसते. सरणाअभावी जळत असणारे मृतदेह आणि भटक्या कुत्र्यांचा गराडा, असे भयावह चित्र या ठिकाणी दिसते. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश भागातील मृतदेह या अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी आणण्यात येतात. या ठिकाणी मार्च व एप्रिल महिन्यात विद्युत शवदाहिन्या सतत धगधगत होत्या. अतिरिक्त ताणामुळे त्या काहीवेळा बंदही पडल्या होत्या. त्यामुळे याठिकाणी पारंपरिक पद्धतीने अंत्यविधीची सोय केली आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार व काही मित्रांसह एका नातेवाइकांच्या अंत्यविधीसाठी दोन जूनला सायंकाळी सहा वाजता गेले होते. त्यावेळी पुरेशा लाकडांअभावी मृतदेह अर्धवट जळाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यानंतर त्यांनी शुक्रवारी (दि. ४) सकाळी पाहणी केली असता, अत्यंत वेदनादायी चित्र पाहायला मिळाले. याठिकाणी सरणासाठीचे बारा ओटे आहेत. प्रत्येक ठिकाणी दोन कुत्री बसलेली होती. काही कुत्री अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे अवयव खात होते. याबाबत तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांना नेमकी कारणे सांगता आली नाहीत. या स्मशानभूमीतील छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये टिपलेली दृश्य भयावह आहेत, तरीही या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

दरम्यान, सदरील घटनेचे गांर्भिय ओळखून आयुक्त राजेश पाटील यांनी तातडीने दखल घेतली. संबंधित अधिकारी आरोग्य अधिकारी डाॅ. राॅय यांनी निगडी स्मशानभूमीचे ठेकेदाराला नोटीस बजाविली आहे. त्यांच्याकडून तातडीने या घटनेचा खुलासा करण्यास सांगितले आहे. त्या ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी खैरनार यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button