ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवी सांगवीत ड्रेनेजसाठी खोदलेला खड्डा ठरतोय धोकादायक

पिंपरी चिंचवड  | पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरात विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची, नवीन कामे केली जातात. नवी सांगवी येथे देखील ड्रेनेजचे काम सुरु आहे. तीन महिन्यांपासून खोदून ठेवलेला खड्डा अद्याप झाकलेला नसल्याने तिथे गंभीर अपघाताची दाट शक्यता आहे. हा ड्रेनेजचा खड्डा परिसरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे.नवी सांगवी येथे एसबीआय बॅंकेजवळ कॉर्नरवर महापालिकेच्या माध्यमातून ड्रेनेजचे काम केले जात आहे. ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे, त्याने ड्रेनेजसाठी खड्डा तीन महिन्यांपूर्वी खोदला. मात्र तो अद्याप झाकला नाही. त्याच्या बाजूला बॅरीगेट लावून फूटपाथ अडवून ठेवला आहे. फूटपाथवर खड्डा असल्याने पादचारी नागरिक थेट रस्त्यावर येऊन चालतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता आहे.

जवळच विठ्ठल मंदिर आहे. या मंदिरात अनेक वृद्ध नागरिक, महिला आणि भाविक येत असतात. याच चौकात काही दुकाने असल्याने तिथेही नागरिकांचा राबता असतो. नागरिकांना खड्ड्याजवळून जावे लागते. त्यामुळे गर्दी आणि वाहतुकीची देखील समस्या निर्माण होते. वृद्ध नागरिकांचा तोल जाऊन त्यात पडण्याचा धोका आहे. त्यामुळे ड्रेनेजसाठी खोदलेला खड्डा झाकण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

76 वर्षीय एक वृद्ध व्यक्ती 21 डिसेंबर रोजी सकाळी या मार्गावरून जात असताना ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ आली. तिथे त्यांचा तोल गेला आणि ते खड्ड्यात पडले. यामध्ये ती व्यक्ती गंभीर जखमी झाली. त्यांना डोक्यात आणि ओठावर एकूण आठ टाके पडले. त्या रात्री ते झोपी गेले आणि झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचे सांगितले. या घटनेत धोकादायक खड्डा महत्वाचा आहे.

त्या संबंधीत व्यक्तीच्या नातेवाईकांनी यासंबंधी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले, हा खड्डा अनेक दिवसांपासून खोदून ठेवला आहे. तो धोकादायक आहे, अनेक नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. वेळीच खड्डा झाकल्यास पुढील अनर्थ टळतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button