breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडीपर्यंत मेट्रो या मनसेच्या मागणीला यश, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी ते निगडी कॉरिडॉर क्र. १ ए या उन्नत मेट्रो मार्गिकेच्या विस्तारीकरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये सुधारणा करून ही अतिरिक्त मार्गिका तयार करण्यात येईल. यासाठी ९४६ कोटी ७३ लाख एवढा खर्च येणार असून राज्य शासनावर १७० कोटी ३ लाख इतका खर्चाचा भार असेल.

या मार्गिकेची लांबी ४.४१ कि.मी. इतकी असून यात ३ स्थानके आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन या विशेष वहन हेतू (एसपीव्ही) मार्फत करण्यात येईल. यासाठी केंद्र शासनाचे एकूण खर्चाच्या १० टक्के सहभाग असून कर्जाच्या स्वरुपात देखील निधी उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाचा एकूण ७९ कोटी ४ लाख तसेच ९० कोटी ६३ लाख रुपये परतफेड करावयाचे दुय्यम कर्ज असे एकूण १७० कोटी ३ लाख असा सहभाग असेल. निगडी ते स्वारगेट मार्गिकेसाठी २०२३ मध्ये ४.९५ लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक होईल असा अंदाज आहे.

—————–

मेट्रो निगडीपर्यंत व्हावी ही सुरुवातीपासूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी होती. निगडीतील हजारो नागरिकांचा विचार करून आम्ही वेळोवेळी प्रशासनाला जाग आणण्याचे काम केले आहे. वेळेप्रसंगी मेट्रोचे कामही बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. आज राज्य सरकारने पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेल्या मागणीला आज खऱ्या अर्थाने यश आले.

– सचिन चिखले, शहराध्यक्ष तथा गटनेता, मनसे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button