breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत ‘ईव्हीएम’ हटाओ -‘आरटीआय’ बचाओ परिषदेचे आयोजन

  • आचार्य अत्रे रंगमंदिरात रविवारी होणार परिषद

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात ईव्हीएम हटाओ-आरटीआय बचाओ जनआंदोलन समितीकडून रविवार (दि.4) सकाळी 10 वाजता  परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेला डॉ. विश्वंभर चौधरी हे केंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्यात केलेला बदल नेमका कशासाठी ? या विषयावर तर अॅड. असीम सरोदे, ई. व्ही.एम.सरकारचा माहिती अधिकार कायद्यावर हल्ला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेला विश्व कल्याण कामगार संघटनेचे दिलीप पवार, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँगेसचे सचिन साठे, भारिपचे देवेंद्र तायडे, एमआयएमचे अकिल मुजावर,मनसेचे सचिन चिखले, शेकापचे नितीन बनसोडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. गणेश दराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता सायकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.व्ही.व्ही. कदम, डॉ. सुरेश बेरी,आपचे प्रकाश पठारे, प्रकाश जाधव, आनंदा कुदळे, प्रदिप पवार, गिरीष वाघमारे, क्षितीज मानव, अॅड.मोहन अडसुळ,काशिनाथ नखाते, सतिश काळे, धनाजी येळकर, अभिमन्यू पवार, प्रल्हाद कांबळे, प्रभाकर माने, उमेश सणस, क्रांतीकुमार कडूलकर, जगन्नाथ आल्हाट, सचिन देसाई डॉ. भास्कर बच्छाव, हरिश तोडकर, सिददीक शेख, अशोक भडकुंबे, राजु वारभुवन, स्वप्नील कांबळे, सतिश गायकवाड यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जनआंदोलनाचे मुख्य समन्वयक मारूती भापकर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button