breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीच्या घरकूल प्रकल्पातील 168 सदनिकांची सोडत  

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून घरकुल प्रकल्पातील ४ सोसायटयांच्या इमारतीमधील एकूण १६८ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत आज काढण्यात आली.

अटो क्लस्टर, चिंचवड येथे झालेल्या संगणकीय सदनिका सोडत महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते काढण्यात आली. या कार्यक्रमास सहा-आयुक्त चंद्रकांत इंदलकर, प्रशासन अधिकारी रविंद्र जाधव, कार्यालयीन अधिक्षक महेंद्र चौधरी व मुख्य लिपिक सुनिल माने, राजेश जाधव संगणक चालक सुजाता कानडे लिपिक सुवर्णा केदारी, संकेत लोंढे, महेमुद शेख तसेच घरकुल समन्वयक अशोक हंडीबाग व दर्शन शिरुडे यांच्यासह मोठया संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात आलेल्या अध्यक्ष सोसायटी क्र.१२१ इमारत क्र.C-20 चे अध्यक्ष हरीष साळवीकर, सोसायटी क्र.१२२ इमारत क्र.D-31 चे अध्यक्ष विकास पिंगळे, सोसायटी क्र.१२३ इमारत क्र.C-25 चे अध्यक्ष अकिल शेख व सोसायटी क्र.१२४ इमारत क्र.C-16 चे अध्यक्ष दत्तात्रय दराडे यांचा महापौर राहुल जाधव यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लाभार्थींनी आता हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारत भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे असे लाभार्थींना संदेश दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button