breaking-newsताज्या घडामोडीपुणे

नाशिक महामार्गावर शिवशाही बसने अचानक घेतला पेट

पुणे |महाईन्यूज|

नाशिक महामार्गावर शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या चालत्या बसला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारातील जावळे वस्ती येथील या बसने पेट घेतला.

दरम्यान सव्वा आठच्या सुमारास या बसने पेट घेतला. बस बाजूला घेत प्रवाशांना सुखरुप खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र आगीत बस संपुर्णपणे जळुन खाक झाली आहे. अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यात आलीये. मात्र अचानक घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button