breaking-newsराष्ट्रिय

किसान क्रांती पदयात्रा : पोलीस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष , अनेक शेतकरी जखमी

नवी दिल्ली –  संपूर्ण कर्जमाफी,  शेतकऱ्यांसाठी पेन्शन, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी  या तीन  प्रमुख मागण्यासह विविध मागण्यासाठी हजारोच्या संख्येने  शेतकरी मंगळवारी किसन क्रांती पदयात्राव्दारे हरिव्दारहून दिल्लीत पोहचले. भारतीय किसान युनियन हे आंदोलन करत आहेत.

यादरम्यान राजधानी दिल्लीच्या शहराच्या वेशीजवळ शेतकऱ्यांना प्रवेश न करू दिल्याने यूपी बाॅर्डर पोलीस आणि शेतकरी याच्यांत संघर्ष झाला. पोलीस आक्रमक झाल्याने या पदययात्रेला हिसंक वळण लागले. पोलीसांनाी शेतकऱ्यांना थांबविण्यासाठी पदयात्रेवर पाण्याचे फवारे साेडले. तसेच आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज सुध्दा करण्यात आला. पोलीसांनी दिल्लीच्या पूर्वभागात 144 कलम (जमामबंदी) लागू केली आहे.

दरम्यान 12 वाजता गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक बैठक घेण्यात येत असून केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कृषि मंत्री राधामोहन सिंह आणि किसान युनियनचे शेतकरी प्रतिनिधी यात सामील होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button