breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नारायण राणे यांना केंद्र सरकारने पुरवली Y दर्जाची सुरक्षा

मुंबई – राज्य सरकारने सुरक्षा कवच काढून घेतल्यानंतर नारायण राणे यांना केंद्र सरकारने Y दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

वाचा :-शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने तरी उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडतील-नारायण राणे

राज्य सरकारकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा दिली जात होती. मात्र काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या नव्या निर्णयानुसार ही सुरक्षा रद्द करण्यात आली होती. ठाकरे सरकारनं सुरक्षा काढल्यानंतर मोदी सरकारकडून नारायण राणेंना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

नारायण राणे यांना केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने ही सुरक्षा दिली आहे. या सुरक्षेव्यवस्थेनुसार 12 सी. आय. एस. एफचे जवान राणेंच्या सुरक्षा ताफ्यात तैनात असणार आहे. महाराष्ट्र सरकारनं भाजपच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर आता थेट केंद्राकडून सुरक्षा दिली गेली आहे. येत्या काळात भाजपच्या इतरही नेत्यांना सुरक्षा देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button