breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अभिग्यान कुंडूने रचला धावनांचा डोंगर

– स्लग : ४५७ धावांची नाबाद खेळी ; ८६ चौकार आणि १३ षटकार

पिंपरी | प्रतिनिधी

१२ वर्षाखालील लिटल चॅम्प्स क्रिकेट स्पर्धेत अविनाश साळवी फौंडेशन ने एच के बाउन्स संघाचा दणदणीत ३६९ धावांनी पराभव केला. अभिग्यान कुंडूचा नाबाद ४५७ धावा आजच्या सामन्यातील वैशिष्ट्य ठरले होते. धायरी येथील मैदानावर हा सामना पार पडला.

नाणेफेक जिंकून अविनाश साळवी फौंडेशन प्रथम फलंदाजी केली. साळवी फौंडेशनकडून अभिग्यान कुंडू याने नाबाद ४५७ धावा (१९१चेंडू, ८६  चौकार, १३ षटकार) ठोकल्या. त्याला आयुष वाडेकर १८ धावा तर मन भानुशाली नाबाद १५ धावा केल्या. साळवी फौंडेशनने निर्धारित ४२ षटकात १ बाद ५३२ धावा केल्या. आज चा सामन्यात अभिग्यानने सुरेख फटकेबाजी केली त्याने शतक ((३८ चेंडू,२१ चौकार, २ षटकार), द्विशतक (९० चेंडू, ४० चौकार, ४ षटकार) त्रिशतक (१३२ चेंडू, ६१ चौकार, ६ षटकार) तर चारशे धावा (१७२ चेंडू, ८० चौकार, ८ षटकार) पूर्ण केल्या.

५३२ धावांचा पाठलाग करताना एच के बाउन्स संघातील एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. अविनाश साळवी संघाचा गोलंदाजी समोर त्याना धावा जमविता आल्या नाही. एच के बाउन्स संघाला ४२ षटकात ७ बाद १६३ करता आल्या.. रिषभ क्षत्रीय २४, द्वित पुजारी १७ धावा काढल्या. विजयी साळवी फौंडेशन संघाकडून मन भानुशाली, आदित्य अवसरे यांनी दोन गडी तर आदित्य खडका , यश पायगुडे,वेदांत गोरे यांनी प्रत्येकी १ गाडी बाद केले नाबाद ४५७ धावा करणाऱ्या अभिग्यान कुंडू ला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आल.

प्रतिक्रिया :

चांगला खेळ करण्यासाठी आमच्या सरांकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे मी चांगली खेळी करू शकलो. चारशे धावा केल्याने मी आनंदित आहे. सरांनी मला आज पाचशे धावांचा लक्ष दिले होते. तसेच मला नाबाद खेळी करण्यास सांगितले होते. हे सारे श्रेय आमच्या चेतन सरांना जाते.

– अभिग्यान कुंडू, खेळाडू.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button