breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

कोरोनाचा आयपीएलला फटका, 14 मार्चला होणार निर्णय

मुंबई | कोरोना व्हायरसचा देशाला फटका बसत असताना आता क्रिकेटप्रेमींसाठी अत्यंत महत्वाची बातमी. अगदी काही दिवसांत आयपीएल 2020 ला सुरूवात होणार होती. पण आयपीएल होण्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आयपीएलशीसंबंधित महत्वाची बैठक शनिवारी होणार आहे.

आयपीएल गवर्निंग काऊन्सिलने कोरोना व्हायरसच्या सद्यस्थितीमुळे शनिवारी 14 मार्च रोजी महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएलबाबच्या आयोजनाबाबत महत्वाचा आणि शेवटचा निर्णय घेतला जाणार आहे. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकेल अशी माहिती दिली होती. बीसीसीआय भारतातील कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता आम्ही सध्याच्या स्थितीची पाहणी करत आहोत त्यावरूनच निर्णय घेतला जाणार आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या बघता आयपीएल सामने स्थगित करण्याचा विचार करत असल्याच सांगितलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button