breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

‘राहुल गांधी ईश्वरानं आपल्याला दिलेलं वरदान’; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला

मुंबई : भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचा नागपूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी ईश्वरानं आपल्याला दिलेलं वरदान आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी विरोधी पक्षाचे नते असल्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. राहुल गांधी ईश्वराने भाजपाला दिलेले वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा, यासाठी आपल्याला भाग्य घेऊन यावे लागते. काँग्रेसने केवळ स्वतःचा विचार केला म्हणून काँग्रेसची ही अवस्था झाली. पक्ष, संघटना याचे महत्त्व संपले. काँग्रेसचा नेता मोठा झाला, पण कार्यकर्ता राहिला नाही. देशातील सर्वात जुन्या पक्षात आज ज्या प्रकारची अवस्था दिसते, त्यानुसार हा पक्ष वर येणे कठीण आहे.

हेही वाचा  –  ‘सरकारने शब्द न पाळल्यास जरांगेंसोबत आंदोलन करणार’; बच्चू कडू यांचा सरकारला इशारा 

भाजपामध्ये मात्र असे होत नाही. परवा अमित शाह यांना विचारले, तुम्ही तुमच्या जेष्ठ-एकनिष्ठ नेत्यांना मुख्यंमत्री बनविले नाही. त्यावर अमित शाह म्हणाले की, भाजपात सर्वात एकनिष्ठ कुणी असेल तर तो आमचा कार्यकर्ता आहे. सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा कुणीही मोठा नाही. भाजपामध्येच हे शक्य आहे. आपण नेतृत्वात बदल करत असतो. असे केले नाही, तर नवीन पिढी तयार होत नाही. ज्यांना बाजूला केले जाते, त्यांना वेगळी भूमिका दिली जाते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काँग्रेसमध्ये मात्र असे होत नाही. तिथे ज्या नेत्याला बदलले जाते, तो पक्षाचीच कबर खोदतो. हे फक्त भाजपामध्येच शक्य होते. कालपर्यंत ज्याच्याकडे सर्वोच्च पद होते, त्याला सांगितले की, तुला आता दुसरे काम दिले जाईल, त्यावर तो नेता हसत हसत नवी जबाबदारी स्वीकारतो. भाजपात काही नेत्यांमध्ये मतभेद निश्चित असतील. पण एकमेकांमधून विस्तव जात नाही, अशी परिस्थिती नाही. ती निर्माणही होणार नाही. तरीही जेव्हा एका तिकीटाचे दोन उमेदवार असतात, तेव्हा मतमतांतरे निर्माण होतात. पण एक सांगू इच्छितो ही निवडणूक भाजपासाठी नाही तर भारतासाठी लढायची आहे. आपल्याला पुन्हा एकदा भारत मोदींच्या हातात द्यायचा आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button