breaking-newsमुंबई

नाताळाच्या प्रार्थनेत गाव तल्लीन, चोरट्यांचा दोन बंगल्यांवर दरोडा

वसई | महाईन्यूज

सर्वत्र नाताळची धूम सुरू असताना प्रार्थना आणि नाताळच्या सेलिब्रेशनसाठी सर्व लोक काल रात्रीपासून चर्चमध्ये होते. या संधीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी दोन मोठ्या चोऱ्या केल्या. चोरांनी वसई येथील दोन बंगल्यांवर डल्ला मारला. यात अंदाजे 73 हजार रोख आणि 25 तोळं सोनं घेवून चोरटे पसार झाले आहेत.

वसई आणि विरारमध्ये ख्रिस्ती बांधवांच्या घराघरांमध्ये नाताळची धूम सुरु आहे. 24 डिसेंबरच्या रात्री प्रत्येकजण नाताळच्या पहिल्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जातो. पण हिच संधी साधत चोरांनी नालासोपारा पश्चिमेकडील नवाळे परिसरातील सराई या कुटुंबियांच्या दोन बंगल्यांवर दरोडा टाकला. दरवाजाची कडी तोडून घरातल्या कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे फरार झाले. चर्चमधील प्रार्थनेनंतर घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

नालासोपारा पश्चिमेकडील नवाळे परिसरात संजाव सराई आणि अॅन्थोनी सराई यांचे बंगले आहेत. नाताळनिमित्त ही दोन्ही कुटुंब रात्री सव्वा नऊच्या सुमारास प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेले होते. आजूबाजूचे गावकरीही चर्चमध्ये गेले होते. हीच संधी साधून चोरांनी संजाव सराई यांच्या बंगल्यातील अंदाजे 15 ते 16 तोळे सोने आणि 53 हजाराची रोख रक्कम तर अॅन्थोनी सरोई यांच्या बंगल्यातील अंदाजे 20 हजार रुपये रोख आणि 10 तोळे सोने लंपास केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button