breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 36,39,855 वर

  • मुंबईत 8,209, पुण्यात 9,955 नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात गुरुवारी नव्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. काल दिवसभरात महाराष्ट्रात 61,695 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 349 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 53,335 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 36,39,855 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 59,153 इतका झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 29,59,056 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 6,20,060 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात तब्बल 8,209 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 50 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 10,097 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 5,53,404 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 12,197 इतका झाला आहे, तर आतापर्यंत मुंबईत 4,54,311 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

तसेच पुणे जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 9,955 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 6,85,970 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 114 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 11,103 इतका झाला आहे. दरम्यान, पुण्यात आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये 5,395 पुणे शहरातील, तर 2,086 पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button