breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडविदर्भ

न्यायालयात महिलेने प्रियकरावर कटरने केला हल्ला, संतप्त महिलेचा कोर्टात भयंकर प्रकार

यवतमाळ । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. तसेच अनैतिक संबंधातून हत्येच्याही घटना वाढत आहेत. यातच आता यवतमाळ जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. यवतमाळ येथील जिल्हा न्यायालयातील आठ क्रमांकाच्या न्यायालयात एका महिलेने प्रियकरावर कटरने हल्ला केला. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. हा प्रकार घडला तेव्हा कोर्टाचे अधिकारी तेथे उपस्थित असल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांनी शहर पोलिसांना पाचारण करून हल्ला करणाऱ्या महिलेला त्यांच्या ताब्यात दिले. दरम्यान, हल्ल्याची वार्ता पसरताच त्या परिसरात गर्दी जमा झाली होती. आज सकाळी 10.45 वाजत ही आग लागली अशी माहिती अग्निशमन दलाने दिली होती. लेव्हल 1 ची ही आग असल्याचे सांगितले गेले. सलग दुसऱ्यांदा या इमारतीमध्ये आगीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा प्रकार घडला तेव्हा कोर्टाचे अधिकारी तेथे उपस्थित असल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांनी शहर पोलिसांना पाचारण करून हल्ला करणाऱ्या महिलेला त्यांच्या ताब्यात दिले. दरम्यान, हल्ल्याची वार्ता पसरताच त्या परिसरात गर्दी जमा झाली होती. विशाल मारोतराव शिंदे (वय ४५) रा. शिंदे नगर यवतमाळ अशी जखमीचं नाव आहे. हल्ला करणाऱ्या महिलेचे विशालसोबत प्रेम संबंध होते. दरम्यान, त्यांचे संबंध महिलेच्या पतीला माहीत झाले. त्यामुळे महिला विरोधात पतीने घटस्फोटाचा खटला दाखल केला. तर दुसरीकडे विशाल सोबतही महिलेचा वाद झाला. यातून या दोघांनी परस्पर विरोधात तक्रारी दाखल केल्या. या प्रकरणात आठ क्रमांकाच्या न्यायालयात सुनावणी होती. न्यायालयासमोर उभे असताना महिला अचानक संतप्त झाली आणि तिने स्वतःजवळ असलेल्या कटरने विशाल शेंडे याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.

हा वार विशालच्या गालावर लागला. तेथे उपस्थित कोर्ट पैरवी रमेश उघडे यांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोर महिलेला ताब्यात घेतले. तेथे महिला पोलीस कर्मचारी पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर तिथे बघ्यांची एकच गर्दी झाली. घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली आणि पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तर जखमी विशाल याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. शहर पोलिसांनी महिला व तिच्या पतीविरोधात प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button