breaking-newsपुणे

‘पीएमपी’च्या रातरणीला खडा पहारा

  • सुरक्षा विभागासह तिकीट तपासणीसांच्या पथकाची नियुक्‍ती

पुणे- गेल्या आठवड्यात मध्यरात्री “पीएमपी’च्या रातराणीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला रस्त्याच्या मध्ये उतरवण्यात आले. चालक, वाहकांनी त्याला दमदाटीही केली. यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी “पीएमपी’ने सुरू केलेल्या रातराणी सेवेच्या सुरक्षेवर प्रश्‍न निर्माण झाले होते. यामुळे अखरे रातराणीची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून त्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. “पीएमपी’च्या सुरक्षा विभाग पथकासह तिकीट तपासणीसांचे एक पथक रातराणीसाठी नियुक्त करण्यात आले आहे.

 

  • 6 मार्गांवर रातराणी सेवा सुरू

  • 20 तिकीट तपासणीस पथके

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी नागरिकांकडून “पीएमपी’चा वापर सर्वाधिक जातो. यासाठी सर्व महत्वाच्या भागात बसफेऱ्या सुरू आहेत. मात्र, “पीएमपी’ची सर्वसाधारण सेवा ही रात्री साडेअकरापर्यंत असते. यानंतर बसेस बंद होतात. यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांचे हाल होत होते. यामुळे रात्र प्रवाशांसाठी पीएमपीने रातराणी सेवा सुरू केली. शहरात प्रामुख्याने पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, शिवाजीनगर या भागात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. यामुळे सध्या शहरातील प्रमुख सहा मार्गांवर रातराणीची सेवा सुरू आहे. यातून अनेक प्रवासी प्रवास करतात. पीएमपीमध्ये एकूण 20 तिकीट तपासणीसांची पथके आहेत. त्याचबरोबर सुरक्षा पथक आहे. ही पथके रात्रीच्या वेळी तिकीट तपासणीबरोबरच प्रवाशांना येणाऱ्या अडचणींवरही लक्ष केंद्रीत करणार आहेत.

गेल्या आठवड्यात रातराणी बसमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर बसण्यासाठी महिलेला जागा दिली नव्हती. यावर महिला प्रवासी यांनी वाहकाकडे मदत मागितली असता वाहकाने मदत न करता तिलाच उलट उत्तर दिले. यानंतर चालकानेदेखील वाहकाला साथ दिली. याची गंभीर दखल घेऊन “पीएमपी’ प्रशासनाने दोघांनाही निलंबित केले. यामुळे रातराणीतील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले.

राखीव जागांवर महिलांचा हक्क
“पीएमपी’मध्ये डाव्या बाजूच्या सीट्‌स महिलांसाठी राखीव असतात. अनेकदा याठिकाणी पुरूष मंडळी बसतात. महिला आल्यानंतर तिला जागा देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. जर एखादा पुरूष महिलेच्या राखीव सीटवर बसलेला असेल आणि महिला आल्यानंतर उठण्यास तयार नसेल, तर अशा वेळेस वाहकाने महिला प्रवाशांना मदत केली पाहिजे. ती जबाबदारी वाहकाची आहे. याबाबत वाहक व चालकांना सूचना दिल्याचे पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्षा नयना गुंडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button