breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांच्या करातील दीड कोटी नाल्यात

  • ऐनवेळच्या प्रस्तावाला स्थायीची मान्यता
  • प्रभाग 19, 21 मधील नाल्यांचा खर्च

पिंपरी – महापालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 19 आणि प्रभाग क्रमांक 21 मध्ये ठिकठिकाणी नाले बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी 74 लाख रुपये तर, 21 नंबर प्रभागातील नाल्यासाठी 75 लाख रुपये असा एकूण एक कोटी 49 लाख रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला आज बुधवारी (दि. 13) झालेल्या स्थायी समितीत ऐनवेळी मान्यता देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये नाले बांधण्यासाठी पालिकेतर्फे निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी मे. कविता एन्टरप्रायजेस, मे. सुयोगराज कन्स्ट्रक्शन, मे. श्रीरंग इन्फ्रा, मे. व्यंकटेश्वरा कन्स्ट्रक्शन, मे. एल. एन. एन्टरप्रायजेस, मे. पी. अॅन्ड. बी. कन्स्ट्रक्शन, मे. एम. जे. कन्स्ट्रक्शन अशा सात निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी मे. कविता एन्टरप्रायजेस या ठेकेदाराची निविदा रकमेच्या 74 लाख 8 हजार 457 पेक्षा 33.01 टक्के कमी दराची होती. तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने आणि ठेकेदार मुदतीमध्ये हे काम करण्यास सक्षम असल्याने त्यांची निविदा स्वीकारण्यास आयुक्तांनी 6 जून 2018 रोजी मान्यता दिली होती.

त्यानुसार मे. कविता एन्टरप्रायजेस या ठेकेदाराकडून निविदा मंजूर दराने 49 लाख 62 हजार 925 रुपयांपर्यंत काम करुन घेण्यासाठी करारनामा करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 21 मधील नाले बांधण्याच्या कामासाठी सहा निविदा प्राप्त झाल्या होत्या. मे. कविता एन्टरप्रायजेस या ठेकेदाराची निविदा 75 लाख 13 हजार 341 पेक्षा 33.11 टक्के कमी दराची आहे. त्यामुळे ती स्वीकृत करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button