breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समितीकडून शहरातील पाच कोटीच्या विविध विकास कामांना मान्यता

पिंपरी – महापालिकेच्या स्थायी समितीकडून शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 4 कोटी 95 लाख ९६ हजार रुपयांच्या खर्चास आज (बुधवारी) बैठकीत मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. 

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील  सन 2017-18 या आर्थिक वर्षात इयत्ता 10 वी व 12 वी मधील 80 % पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या मात्र कागदपत्रा अभावी अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी कागदपत्राची पूर्तता करुन पात्र ठरलेल्या 274 विद्यार्थांना बक्षीसपर रक्कम देण्यासाठी येणा-या सुमारे 32 लाख 45 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्रमांक 8 इंद्रायणीनगर मध्ये ठिकठिकाणी चौकांमध्ये म्युरल्स बसविणे व सुशोभिकरणाची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 58 लाख 10 हजार रुपयांच्या, पाणीपुरवठा विभागाकडील कवडेनगर, काटेपुरम इत्यादी परिसरातील जुने पाईपलाईन बदलुन नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी येणा-या सुमारे 27 लाख 38 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिका जलशुध्दीकरण केंद्र से.क्र. 23 येथे पाणी शुध्दीकरण प्रक्रियेसाठी द्रवरुप क्लोराईड व पावडर पुरविण्यासाठी येणा-या सुमारे 72 लाख 77 हजार रुपयांच्या खर्चास, मनपाच्या विविध कार्यालयामध्ये इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी येणा-या सुमारे 28 लाख 74 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र.19 (नवीन प्रभाग क्र.16) मधील वाल्हेकरवाडी परिसरातील नाला बांधणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 49 लाख 62 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्रमांक 21 मध्ये ठिकठिकाणी नाले बांधण्यासाठी येणा-या सुमारे 50 लाख 25 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button