breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, हातात तलवार घेऊन व्हिडीओ केला पोस्ट!

Narendra Modi | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी दिलीय. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार अशी धमकी त्याने दिली आहे. त्याने सोशल मिडीयावर हातात तलवार घेऊन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मोहम्मद रसूल कद्दारे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ५०५ (१) (ब), २५ (१) (ब) तसेच शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा     –      Maharashtra Weather | पुढील ४८ तासांत ‘या’ भागात गारपीटीची शक्यता! 

दरम्यान, गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींची हत्या आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणार ईमेल केंद्रीय सुरक्षा एजन्सीला आला होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या सुटकेच्या मागणीसह ५०० कोटी रूपये मागण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button