breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

नागपूर पदवीधर मतदारसंघ; महाविकासआघाडीचे अभिजित वंजारी विजयी

मुंबई – विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत महाआघाडीचे अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. अभिजित वंजारी यांना 61 हजार 701 तर भाजपचे संदीप जोशी यांना 42 हजार 791 मते मिळाली.

नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये 17व्या एलिमिनेशन फेरीनंतर कोटा पूर्ण केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी 60 हजार 747 मतांचा कोटा ठरवला  होता. मतदारांनी दिलेल्या या कौलाचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस व महाआघाडीला निश्चितच होईल असा विश्वास अभिजित वंजारी यांनी व्यक्त केला आहे.  

अवश्य वाचाः पदवीधर मतदार संघ निवडणूक : चंद्रकांत पाटलांच्या संकूचित वृत्तीमुळे भाजपाचा पराभव!

गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्याच फेरीत वंजारी यांनी ४ हजार ८५० मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीत वंजारी यांना १२,६१७ तर जोशी यांना ७,७६७ मते मिळाली. दुसऱ्या फेरीअखेर एकूण ५१ हजार २३१ मतांची मोजणी पूर्ण झाली. त्यातील तब्बल ४ हजार ७६९ मते अवैध ठरली. 

नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या दिग्गज व नामवंत नेते या मतदारसंघातून निवडूण आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे व या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अनिल सोले यांचे तिकीट कापत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना संधी देण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button