breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

नाक्यानाक्यावर चोख बंदोबस्त; रस्त्यांवर शुकशुकाट…

पुणे शहरात दिवसागणिक वाढणारी कोरोना रूग्णांची स्थिती पाहता शहरामध्ये पुणे मनपा कडून 14 जुलै ते 19 जुलै आणि 19 जुलै ते 23 जुलै असा दहा दिवसांचा लॉकडाऊन 2 टप्प्यांत पुन्हा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 14 जुलैच्या मध्यरात्री 1 वाजल्यापासून लॉकडाऊन पुन्हा कडक करण्याचे आदेश दिल्यानंतर आता सकाळपासून नाक्यानाक्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर वाहनांचीही कसून तपासणी केली जात आहे. विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन पुणे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान आजपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये 18जुलै पर्यंत पुणेकरांना सर्व किराणा माल दुकान, व्यापारी दुकानं बंद ठेवण्याचे आदेश आहे. 19 जुलै पासून किराणा माल दुकानं सकाळी 8-12 या वेळेत सुरू राहतील. तर या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी पूर्ण क्षमतेने सेवेत असतील. तर उद्योग आणि आयटी कंपनीमध्ये 15% मनुष्यबळासह कार्यालयं सुरू राहणार आहेत. मात्र इतर अनावश्यक गर्दी टाळून कोरोनाचा पुणे शहरातील फैलाव रोखण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.

पुणे मध्ये काल म्हणजे 13 जुलैच्या रात्री पर्यंत पुणे मनपा मध्ये एकूण 29612 रूग्णांची नोंद आहे तर 897 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 6815 रूग्णांची नोंद आहे तर 123 मृत्यू नोंदवले गेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button