breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : वाढत्या जलपणीमुळे डासांचा उपद्रव; नागरिक हैराण

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील पवना, मुळा, मुठा, इंद्रायणी नदीतील जलपर्णीचा वापर खत, जनावरांसाठी खाद्य, जैविध इंधन निर्मितीसाठी होवू शकतो. याबाबत वरिष्ठ पातळीवर धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाने केली आहे.

 जलप्रदुषणामुळेच जलपर्णी वाढते. त्याचा उपयोग करून घेतला तर, शापाऐवजी वरदानही ठरू शकेल. वॉटर हार्वेस्टिंग या नावाने ओळखल्या जाणार्‍या पणनवनस्पतीचा पाण्यावर तरंगणारी लांब देठ असलेली जाड हिरवी पान आणि जांभळ्या रंगाची फुले असलेली ती मूळची दक्षिण अमेरिकेतील जगभरात उष्ण प्रदेशातील नद्या व जलसाठ्यांमध्ये तिने जम बसवला आहे. पाण्यावरील तिच्या घट्ट थरामुळे पाण्याचा प्रवाह मंदावतो. जलपर्णी उत्तम जागा ठरते. ती फोफायला लागली की तिला थांबवणे अवघड बनते. पवना, मुळा, मुठा नदीमधील दुषित पाण्यामुळेच जलपर्णी वेगाने वाढत आहे. चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदिराजवळील बंधार्‍यामधून केमिकलयुक्त पाणी नदीत सोडल्याने पाणी प्रदुषित झाले आहे. त्यात नदीकाठच्या अनेक गृहसंकूलाचे नाल्यातून मैलामिश्रीत पाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे नदी प्रदुषित झाली आहे. अनेक ठिकाणी रात्री गुपचूप केमिकल मिश्रीत पाणी सोडले जाते. त्याचा शोध महापालिका प्रदुषण नियंत्रण मंडळाने घेण्याची आवश्यकता आहे. केवळ दुर्लक्षामुळेच सर्व नद्याची भयावय स्थिती काही दिवसांतच झाली आहे. यापूर्वीही कोट्यवधी नागरिकांच्या कराद्वारे जमविण्यात येणारा पैसा खर्च केला आहे. तरीदेखील आज परिस्थिती ‘जैसे थे’ च आहे. त्यात काही ठेकेदारांची आर्थिकस्थिती सुधारली जाते, यात शंका नाही. तेदेखील केलेल्या रितसर केलेल्या कामाचाच पैसा मिळवितात. या जलपर्णीवर कायमस्वरूपी उपाय देखील होवू शकतो. राज्य शासन पातळीवर त्वरित सद्यस्थितीची पाहणी करणे, काळाचीच गरज निर्माण झाली आहे. पवना नदीतील जलपर्णीमुळे डासांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढली आहे. चिंचवडवासी वाढत्या डासांमुळे हैराण झाले आहे. वाढत्या डासांमुळे डेंगू सारख्या रोगाची लागण होवू शकते.
जलपर्णीबाबत अमेरिकेच्या विविध प्रांन्तांत 1970 च्या दशकात नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनीर्स्टेशन तर्फे (नासा) या संस्थेने पुढाकार घेतला. मिसिसिपीच्या ‘सेंट लूईस बे’मध्ये मैलापाणी साठवण्याच्या 40 एकर तळ्यात ही जलपर्णी लावण्यात आली. त्याचा परिणाम इतका झाला की, एकेकाळी दरुगतीने भरून जाणारा हा परिसर पूर्णपणे पलटला. टेक्सास, फ्लोरिडो, जॉर्जिया अशा अनेक प्रांन्तामध्येही असे प्रायोगिक प्रकल्प उभे राहिले. जलपर्णीपासून मिथेनची निर्मिती करून इंधन मिळविले. काहींनी त्यापासून खत तयार केले. जॉर्जिया प्रांन्तातील हक्—युलस शहरात प्रतिदिवशी 13 लाख लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. बांग्लादेश, म्यानमार, फिलिपिन्स व आफ्रिकेतील काही देश जलपर्णीपासून खत निर्मिती करतात. टोपल्यासारखे वस्तूही बनवितात. भारतात मात्र, त्याच्या उपयोगाकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.
आपल्याकडे सांगली येथे 1990 च्या दशकात प्रयोग झाले. ज्येष्ठ अभियंते व्ही.आर. जोगळेकर यांनी शिवसदन सहकारी औद्योगिक वसाहतीत तो यशस्वीपणे राबविला. सांगली पालिकेनेही पाच गुंठ्यावर असा प्रायोगिक जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनीही त्यात त्यावेळी रस घेतला होता. मात्र, आता या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले आहे. असे प्रकल्प भारताच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणारे आहेत. जलपर्णीद्वारे जलशुद्धीकरणाचा प्रकल्प उभा करताना सांडपाण्याचे प्रमाण लक्षात घ्यावे लागते. जलपर्णी दुषित घटक शोषून घेत असते. तिचा काही भाग सातत्याने काढावा लागतो. जलपर्णी वाढीचा वेग चांगला असल्याने ती पुन्हा आपोआप उगवते, काढलेल्या जलपर्णीचा वापर खत, जनावरांसाठी खाद्य, जैविक इंधन निर्मिती किंवा इतर कारणांसाठी करता येवू शकतो. आपल्याकडे ओसाड जमिनी, जागा आहेत. जवळपास जागा नसेल तर हे प्रदुषित पाणी पंप करून इतरत्र नेणेही शासनाला परवडणारे आहे. असे जोगळेकर यांनी मत व्यक्त केले होते. वाढत्या जलप्रदुषणाच्या काळात तिचा उपयोग करून घ्यालयाच पाहिजे. त्यासाठी राज्यशासनातील धोरणकर्त्यांनी वरिष्ठ पातळीवरून लक्ष घालावे लागेल. सांगलीच्या प्रयोगाची त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील याबाबत माहिती घेतली होती. आता ते विद्यमान महाविकास आघाडीत कार्यरत आहे. त्याच्या समवेत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदींनी लक्ष दिले तर, पवना, मुळा, मुठा नदीतील जलपर्णी प्रयोगाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरू शकेल. राज्यशासनाने राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय, केंद्रीय जलशक्ती मंत्रालय यांनी राष्ट्रीय नदी संवर्धन अंतर्गत नुकतेच नाग नदी प्रदुषण रोखण्यासाठी 2412.64 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिका करणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समन्वयक समिती नियुक्त करण्यात येणार आहे. नागपूर प्रमाणेच पुणे जिल्ह्यातील लोकसंख्येमुळे पवना, मुळा, मुठा, इंद्रायणी या प्रमुख नद्यांमधील जलपर्णी रोखण्याबाबत वेळीच उपाय योजना करणे, काळाची गरज आहे.
सध्यातरी रात्री नदीपात्रातील पाण्याचे नमूने घेवून प्रदुषण नियंत्रक दोन्ही महापालिकेच्या वतीने तपासणीकडे पाठवावे. तसेच, नाले, गृहसंकूल, नदी किनार भागातील उद्योग, व्यवसाय यांची तज्ञांकडून पाहणी करून नेमके नदीप्रदुषण करणारे रासायनिक मिश्रीत, मैलापाणीचा नेमका उगम कोठून होतो. यासाठी ठेहळणी पथकाची नेमणूक करावी, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी अ‍ॅड. मनोहर सावंत, सूरज आसदकर, मनोहर जेठवाणी, मुकेश चुडासमा, निर्मला माने, नारायण भोसले, डॉ. राजेंद्र कांकरीया, संगीता जाधव, डॉ. राजेश मेहता, मुकेश पंड्या, ज्योती डोळस, हार्दिक जानी, शरद चव्हाण यांनी ईमेलद्वारे सदर माहिती पाठविली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button