breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जनता कर्फ्यू’ला प्रतिसाद, रस्त्यावर शुकशुकाट

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांचा जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. करोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात जनता कर्फ्यू लागू केली आहे. त्याला पिंपरी-चिंचवड आणि उपनगरातील रहिवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.

पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, रहाटणी, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, थेरगाव, डांगे चौक, निगडी, वाल्हेकरवाडी भागात रस्त्यावर शुकशुकाट आहे. छोटे-मोठ्या व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला आहे. सोसायटी व कोलनीमधील नागरिकांनी तंतोतंत बंद पाळला आहे. शाळेला सुट्टी असूनही लहान मुले रस्त्यावर फिरताना दिसत नाहीत. त्यामुळे या जनता कर्फ्यूला सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत आहे.

विभागीय आयुक्तांनी जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेण्यासाठी शक्य त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, सांगवी, हिंजवडी, पिंपळे सौदागर भागात पोलीस बंदोबस्त ठेवला आहेत. सोसायटी, कोलनी अशा परिसरात पोलीस गस्त घालून रस्त्यावर फिरणा-या नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button