breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

‘मुलं जन्माला घालू शकत नसल्यानेच राहुल गांधी अविवाहित’; भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

लस घेतल्याने मुलं होणार नाहीत

काँग्रेस नेते राहुल गांधींनी विदेशातून भाजपावर हल्लाबोल केला. यावरून कर्नाटकमधील एका भाजपा नेत्याने राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुलं जन्माला घालू शकत नसल्यानेच राहुल गांधी अविवाहित राहिले, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कतिल यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांनी लोकांना करोनाची लस न घेण्याचं आवाहन केलं होतं. लस घेतल्याने मुलं होणार नाहीत. अपंगत्व येऊ शकतं, असं सांगत होतं, अशी टीका नलिन कुमार कतिल यांनी केली.

नलिन कुमार कतिल यांच्या विधानाचा दाखला देत काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंग सूरजेवाला यांनी कतिल यांना ‘जोकर’ म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. कर्नाटक भाजपाच्या सर्कसमधील जोकर शाब्दिक जुलाबाने त्रस्त आहेत. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने चर्चेत राहण्यासाठी अशी विधान करतात. त्यांना गंभीर्याने घेऊ नये, असं प्रत्युत्तर रणदीर सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button