breaking-newsराष्ट्रिय

नव्या वर्षातील इस्त्रोची पहिली मोहिम यशस्वी, लष्करी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने गुरुवारी रात्री मायक्रोसॅट आर आणि कलामसॅट या दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. या वर्षातील  इस्त्रोची पहिलीच मोहिम यशस्वी ठरली आहे. मायक्रोसॅट आर हा ७४० किलो वजनाचा लष्करी उपग्रह आहे. खास लष्करी उद्देशांसाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे.

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन रात्री ११.३७ मिनिटांनी पीएसएलव्ही सी-४४ रॉकेट दोन्ही उपग्रहांना घेऊन अवकाशाच्या दिशेने झेपावले. कलामसॅट हा विद्यार्थ्यांनी बनवलेला छोटा उपग्रह आहे. अवघ्या १.२ किलो वजनाचा हा सर्वात हलका उपग्रह आहे.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Andhra Pradesh: launches mission, carrying and from Satish Dhawan Space Centre, Sriharikota.

144 people are talking about this

पीएसएलव्ही सी-४४ ने मायक्रोसॅट आरला कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केले. संरक्षण संशोधन संस्था डीआरडीओच्या प्रयोगशाळेत मायक्रोसॅट आर उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे. इस्त्रोचे अध्यक्ष के.सिवन यांनी यशस्वी मोहिमेसाठी टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button