breaking-newsराष्ट्रिय

शाहिद कपूरच्या चित्रपटाच्या सेटवर शूटिंगदरम्यान एकाचा मृत्यू

अभिनेता शाहिद कपूरच्या आगामी ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका क्रू मेंबरचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तराखंडमधील मसुरी इथं या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. शूटिंगदरम्यान जनरेटरचं काम पाहणाऱ्या ३५ वर्षीय राम कुमार याचा मृत्यू झाला.

शूटिंगदरम्यान सेटवर जनरेटर मागवण्यात आला होता. त्या जनरेटरमधील पाण्याची पातळी तपासण्यास गेला असता राम कुमारचा मफलर जनरेटरच्या पंख्यात अडकला. मफलरमुळे तोसुद्धा पंख्यात ओढला गेला. या अपघातात राम कुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

३५ वर्षीय राम कुमार मुजफ्फरनगरच्या किनोनी गावाचा रहिवासी होता. या अपघाताची कल्पना त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. या दुर्घटनेनंतर चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

‘कबीर सिंग’ या चित्रपटात शाहिद आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दुर्घटनेवेळी शाहिद आणि कियारा घटनास्थळी उपस्थित नव्हते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button