breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

नवी मुंबईत प्रेयसीला पळवल्याच्या रागातून व्यावसायिकाची हत्या

नवी मुंबई – नवी मुंबईतील कामोठे परिसरात व्यावसायिक शांताराम कुटाळ यांच्या झालेल्या हत्येचे गूढ पोलिसांनी 48 तासातच उलगडलेले आहे. ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचे उघडकीस आले आहे.

व्यावसायिक शांताराम कुटाळ यांची बुधवारी रात्री गोळ्या झाडून आणि चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. आपल्या प्रेयसीला पळवून नेल्याच्या रागातून आरोपी अनिल डेरे याने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

अनिल डेरे याने आपल्या प्रेयसीला अहमदनगरमधील आळेफाटा भागात ठेवले होते. मात्र शांताराम कुटाळ आणि अनिल डेरे याच्या प्रेयसीमध्ये प्रेमसंबंध जुळले. काही दिवसांनी शांताराम यांने तरुणीला पळवून कामोठे येथील आपल्या घरी आणून ठेवले. आपल्या प्रेयसीशी प्रेमसंबंध जुळवून तिला पळवून नेल्याचा राग अनिल डेरे याच्या मनात धुसफुसत होता.

डेरे यांने आपल्या दोन साथीदारांसह शांताराम कुटाळ यांची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button