breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

वाकडमध्ये खासगी बस पलटल्याने भीषण अपघात

पुणे –  बंगळुरू महामार्गावर खासगी बसने कठड्याला धडक दिल्याने अपघात झाला आहे. केवळ नशीब बलवत्तर असल्याने बस मुळा नदीत पडली नाही, मुळा नदीच्या पुलावरील कठड्याला धडक देऊन बस पुढे जाऊन डाव्या बाजूने उलटली. या अपघातात यात ऐकूण ६ ते ८ प्रवासी जखमी झाले आहेत, तर दोन जण गंभीर जखमी आहेत. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात बेलापूर कोर्टाच्या न्यायधीश चंद्रशीला सचिन पाटील यांना देखील गंभीर इजा झाली असून त्यांच्यासोबत चार वर्षीय स्वरा पाटील ही त्यांची मुलगी देखील गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या बस क्रमांक एम.एच-०९ सी.व्ही-३६९७ हिचा वाकड परिसरातील मुळा नदीच्या पुलावर अपघात झाला. भरधाव वेगात असलेली खासगी बस मुळा नदीच्या कठड्याला जोरात धडकली. नशीब बलवत्तर असल्याने बस नदीत न कोसळता पुलाच्या पुढे जाऊन डाव्या बाजूला उलटली. या बसमध्ये ३० प्रवासी होते. यातील ६ ते ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर, बेलापूर कोर्टाच्या न्यायधीश चंद्रशिला सचिन पाटील यांना गंभीर इजा झाली आहे. सोबतच चार वर्षीय मुलगी गंभीर जखमी आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button