breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

कॉंग्रेस पक्षाकडून संजय झा यांचे निलंबन

मुंबई | राजस्थानमध्ये सध्या मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. कॉंग्रेस पक्षाचे दोन महत्वाचे नेते, अशोक गहलोत व सचिन पायलट एकमेकांसमोर ठाकले आहेत. सचिन पायलट 30 आमदारांचे पाठबळ घेऊन दिल्लीत हजर झाले आहेत. त्यानंतर राजकारणातील अनेक नेत्यांनी सचिन पायलट यांना समर्थन दिले. अशात संजय झा यांना पक्षविरोधी भूमिका आणि पक्षामधील शिस्तीचा भंग केल्याबद्दल तातडीने कॉंग्रेस पक्षाकडून निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसने याबाबत माहिती दिली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या सहीचे निलंबनाचे पत्र महाराष्ट्र कॉंग्रेसने सोशल मिडियावर शेअर केले आहे.

सध्या राजस्थानमध्ये चालू असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये संजय झा यांनी एक ट्वीट करत पक्षाला काही सल्ले दिले होते. यामध्ये ते म्हणतात, ’राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावे. कॉंग्रेस कमकुवत असल्याने, तीन वेळा मुख्यमंत्री असलेले अशोक गहलोत यांना मोठी जबाबदारी देऊन, त्यांना पक्षाला बळकटी देण्यास सांगितले पाहिजे.’ पुढे कॉंग्रेस नेते संजय झा म्हणतात. ‘राजस्थानात कॉंग्रेसने नवीन अध्यक्ष दिला पाहिजे.’ कदाचित संजय झा यांचे हेच सल्ले पार्टीला झोंबले असतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button