breaking-newsआंतरराष्टीय

नवाज शरीफना तुरुंगात ठेवण्यासाठी आयएसआयचा दबाव: न्या. शौकत सिद्दीकी

लाहोर (पाकिस्तान): पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना तुरुंगात ठेवण्यासाठी न्यायाधीशांवर दबाव आणला जात आहे. इस्लामाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश शौकत सिद्दीकी यांनी ही गोष्ट उघड केली आहे. रावळपिंडी बार असोसिएशनमध्ये आपल्या भाषणात त्यांनी असे सांगितले, की न्यायपालिका आणि मीडिया दोन्हींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयएसआयकडून दबाव आणला जात आहे, 25 जुलै रोजी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी नवाज शरीफ तुरुंगातून बाहेर पडू नयेत आणि आयएसआयला लाभदायक होतील असे निकाल द्यावेत अशी आयएसआयची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आज पाकिस्तात न्यायपालिका स्वतंत्र नाही आणि मीडियालादेखील लष्कराच्या नियंत्रणाखाली असून त्यांना लष्कराकडून आदेश मिळत आहेत, असे न्यायमूर्ती शौकत सिद्दीकी यांनी सांगितले.वेगवेगळ्या प्रकरणात आपल्याला हवे तसे निकाल लागण्यासाठी आपल्याला हवी तशी खंडपीठे आयएसआयकडून तयार केली जातात. आणि हवे तसे निकाल लावून घेतेले जातात. नवाज शरीफ आणि त्यांची कन्या मरीयम 25 जुलैपूर्वी तुरुंगातून बाहेर पडू नयेत यासाठी शरीफ परिवाराचे अपील 25 जुलै पूर्वीसुनावणीस घेऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button