breaking-newsराष्ट्रिय

नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान गोळीबार, महिला जखमी; माजी आमदाराला अटक

दिल्लीत नववर्षाची पूर्वसंध्या साजरी करताना हवेत गोळीबार केल्याचा आरोप असलेले जदयूचे माजी आमदार राजू सिंह यांना दिल्ली पोलिसांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील गोरखपूरहून अटक केली. या गोळीबारात एक महिला डोक्यात गोळी लागून गंभीर जखमी झाली होती.

राजू सिंह यांच्याजवळून एक पिस्तूल ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना दिल्लीला आणण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी सिंह यांच्या वसंतकुंज येथील फार्म हाऊसवरून दोन रायफली आणि ८०० काडतुसे जप्त करण्यात आली होती. डोक्यात गोळी लागून जखमी झालेल्या या महिलेला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर रुग्णालयाने याबाबत पोलिसांना कळवले होते. बिहारमधील माजी आमदार असलेल्या सिंह यांनी केलेल्या गोळीबारातच ही गोळी लागल्याची माहिती आहे. जखमी झालेली अर्चना गुप्ता ही महिला वास्तुविशारद आहे.

राजू सिंह हे बिहारच्या मुजफ्फरनगर येथून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 2015 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असलेले सिंह यांच्यावर बिहारमध्ये एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. 31 डिसेंबर रोजी फार्म हाऊसवरील पार्टीसाठी एकूण 60 जणांना बोलावण्यात आले होते. पोलिसांनी या गोळीबाराप्रकरणी तिथे उपस्थित असलेल्या 38 जणांची चौकशी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button