breaking-newsआंतरराष्टीयमनोरंजन

कादर खान यांच्या पार्थिवावर कॅनडात होणार अंत्यसंस्कार

आपल्या संवादलेखनानं आणि अभिनयानं प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं १ जानेवारीला निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज ( ३ जानेवारी ) कॅनडातील मिडॉवेल दफनभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या चार महिन्यांपासून कादर खान यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयत उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना श्वसनाचा अधिक त्रास जाणवू लागल्यानं त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आलं होतं. ‘प्रोग्रेसिव्ह सुप्रान्युक्लियर पाल्सी या रोगानं कादर खान ग्रस्त होते, त्यामुळे त्यांचा तो जात होता. चालता येत नव्हते, तसेच त्यांना विस्मरणही जडले होते.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Canada: from veteran actor & screenwriter Kader Khan’s funeral ceremony held in Mississauga yesterday. He passed away at the age of 81 in a hospital in Toronto on January 1

ANI यांची इतर ट्विट्स पहा

विनोदी अभिनेता अशी ओळख मिळवताना त्यांनी स्वत:ची अशी खास शैली निर्माण केली होती. पण त्याचबरोर ते उत्तम संवादलेखनही करायचे. अभिताभ बच्चन, गोविंदा यांच्या कारकीर्दीस लेखक म्हणून त्यांनी आकार दिला. शराबी, लावारिस, मुक्कदर का सिकंदर नसीब अग्निपथ यांसारख्या बच्चन यांच्या गाजलेल्या चित्रपटांचं संवाद लेखन त्यांनी केलं. तर गोविंदासोबतची त्यांची जोडीही विशेष गाजली. नंतरच्या काळात ते मुलासह कॅनडात निघून गेले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button