breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

जल्लोष शिक्षणाचा : उपक्रम महापालिका प्रशासनाचा अन्‌ उदो उदो भाजपा आमदारांचा!

महापालिका शिक्षण विभागाला राजकीय हस्तक्षेपाचे ग्रहण : पिंपरी-चिंचवडकरांच्या डोळ्यांत धुळफेक, राजकीय अजेंडा

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘जल्लोष शिक्षणाचा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि कौशल्य विकासाचे उपक्रम घेतले जातात. मात्र, याच उपक्रमांच्या माध्यमातून भाजपाच्या विधान परिषद आमदार उमा खापरे यांची राजकीय ‘चमकोगिरी’ सुरू आहे. त्यामुळे बाल चित्रकला स्पर्धा ‘जल्लोष शिक्षणाचा’ उपक्रमांतर्गत आहेत, भाजपा पुरस्कृत ‘नमो चषक’ उपक्रमांतील आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वास्तविक, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी राज्य सरकारच्या निर्देशानुसार आणि स्वयंबुद्धीने काम करणे अपेक्षीत आहे. केवळ सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून उमा खापरे यांना वेगळी वागणूक देणे, ही बाब अशोभनीय आहे. दुसरीकडे, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘इमेज बिल्डिंग’ साठी हाती घेतलेला भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उपक्रम ‘नमो चषक’ आणि ‘जल्लोष शिक्षणाचा’ याचा काडीमात्र संबंध नाही. पण, तरीही संबंधित कंपनी आणि प्रशासनाला हातीशी धरुन हा कार्यक्रम ‘नमो चषक’च्या नावाने खपवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, महापालिका ‘जल्लोष शिक्षणाचा’ उपक्रमावर खर्च करीत आहे. त्या खर्चात भाजपाच्या विधान परिषद आमदार उमा खापरे स्वत:चे आणि पक्षाचे ‘ब्रँडिंग’ करीत आहेत. यावर महापालिका प्रशासन ‘‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’’ अशा भूमिकेत का आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महापालिका प्रशासनचा अधिकृत बॅनर.

खासगी संस्थेच्या माध्यमातून जल्लोष शिक्षणाचा उपक्रम महापालिका प्रशासन राबवत आहे. त्यामुळे संबंधित संस्था हा उपक्रम त्यांच्या कार्य अहवालामध्ये नमूद करणार, हे निश्चित आहे. त्यासाठी निर्धारित खर्च महापालिका प्रशासन करणार आहे. आज झालेल्या कार्यक्रमासाठी सर्व सोयी-सुविधा महापालिका प्रशासनानेच पुरवल्या आहेत. महापालिकेचे विद्यार्थी, सर्व स्टाफ आणि स्वयंसेवक प्रशासनाचे आणि जाहिरातबाजी मात्र भाजपाच्या आमदारांची, अशी स्थिती आहे. राज्यात राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना अशा तीन पक्षांचे सरकार आहे. या तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी महापालिका प्रशासनाचा कार्यक्रम आपल्या नावाने खपवल्याचा प्रयत्न केल्यास प्रशासन केवळ मूग गिळून गप्प बसणार आहे का? असा संतत्प सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महापालिका विकासकामे आणि प्रकल्पांसाठी श्रेयवाद सर्वश्रृत आहे. आता शिक्षण विभागातील उपक्रमांवर राजकीय व्यक्ती डल्ला मारत असतील, तर प्रशासक म्हणून शेखर सिंह आणि प्रशासनाने आपल्या कार्यपद्धतीबाबत आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.

भाजपाचा प्रसिद्धीलोलूपपणा…

महापालिकेच्या ‘जल्लोष शिक्षणाचा’ उपक्रमांतर्गत दुर्गा टेकडी, निगडी-प्राधिकरण येथे पिंपरी-चिंचवड मनपा शाळांतील मुलांसाठी बाल चित्रकला स्पर्धा- २०२४ घेण्यात येत आहेत. त्याठिकाणी पालिका प्रशासनाने फ्लेक्सही उभारले आहे. याच आवारात याच स्पर्धेला ‘नमो चषक-२०२४’ बाल चित्रकला स्पर्धा अशी बॅनरबाजी आमदार उमा खापरे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धा महापालिकेची आणि ब्रँडिंग भाजपाचे असे चित्र चव्हाट्यावर आले असून, यामुळे भाजपाचा प्रसिद्धलोलूपपणा उघड्यावर पडला आहे.

भाजपा आमदार उमा खापरे यांचा बॅनर.

महापालिका प्रशासनाचा खर्च आणि प्रचार भाजपाचा अशी परिस्थिती आहे. आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासनाची भूमिका निंदनीय आहे. विद्यार्थ्यांशी निगडीत असलेल्या उपक्रमामध्ये राजकीय प्रचारासाठी खटाटोप करणे, आक्षेपार्ह आहे. याबद्दल आयुक्त आणि भाजपाच्या आमदारांनी शहरवासीयांची माफी मागावी.
– तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button