breaking-newsआंतरराष्टीय

थायलंड गुहेतील मुलांना वाचवण्यासाठी एलॉन मस्कची छोटी पाणबुडी

चियांग राय – स्पेसएक्‍स चे एलॉन मस्क यांनी थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांना वाचवण्यासाठी एक छोटी पाणबुडी बनवली आहे. एलॉन मस्क यांची स्पेसएक्‍स रॉकेट कंपनी या पाणबुडीची चाचणी घेत आहे. त्याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. या पाणबुडीची चाचणी यशस्वी होताच 17 तासाच्या विमानप्रवासाने ही पाणबुडी थायलंडमध्ये पाठवण्यात येणार आहे.

23 जूनपासून थायलंडमधील गुहेत अडकून पडलेल्या 12 ज्युनियर फुटबॉलपटूंना आणि त्यांच्या कोचला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. कालच त्यापैकी सहा जणांची सुटका करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Elon Musk

@elonmusk

Got more great feedback from Thailand. Primary path is basically a tiny, kid-size submarine using the liquid oxygen transfer tube of Falcon rocket as hull. Light enough to be carried by 2 divers, small enough to get through narrow gaps. Extremely robust.

मस्क यांनी तयार केलेल्या अल्युमिनियमच्या पाणबुडीचे व्हिडियो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. मस्क यांच्या मस्क्‍स बोरिंग कंपनीचे चार इंजिनीयर्स सध्या थायलंडमधील गुहेजवळ असून पाणबुडीसारख्या एखाद्या छोट्या उपकरणासाठी अधिकाऱ्यांनी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button