breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नदी पात्रातील अनधिकृत झोपड्यांवर कारवाईचे आदेश – महापाैर उषा ढोरे

प्रभाग क्र. 32 मधील प्रलंबित प्रश्नाची आढावा बैठक, महापाैरांकडून तत्काळ कार्यवाहीच्या सुचना

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड शहर व परिसरात नदीपात्रातील अनधिकृत झोपडपट्टीमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या झोपड्यांवर तत्काळ कारवाई करा, अशा सुचना महापाैर उषा ढोरे यांनी दिल्या.

चिंचवडच्या ऑटो क्लस्टरला प्रभाग क्रमांक. 32 मधील प्रलंबित प्रश्नाबाबत महापाैराच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर,नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नगरसदस्या शारदा सोनवणे, सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी महापाैर ढोरे यांनी प्रभागातील रस्त्यांचे भूसंपादनाचे तातडीने मार्गी लावा, रस्ते विकसित करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे, नदीपात्रातील अनधिकृत झोपडपट्टीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यावर तातडीने कारवाई करावी, प्रियदर्शनी येथील मैदान विकसित करणे, कलम २०५ अंतर्गत विविध रस्त्यांच्या जागा ताब्यात घेण्यात यावी, मोकाट कुत्री, डुकरे पकडण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी,

अनियमित व दुषित पाणी पुरवठा होत असून त्यावर उपाययोजना करावी, सांगवी परिसरातील अनधिकृत नळजोडणीवर स्वतंत्र मोहीम राबवून कारवाई करण्यात यावी, तसेच धोकादायक वृक्षांबाबत फाद्यांची छाटणी करावी, नव्याने विकसित होणा-या रस्त्यावर पथदिवे लावणे, नदीपात्रातील जलपर्णीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून जलपर्णी तातडीने काढण्याच्या सूचना महापौर उषा ढोरे यांनी दिल्या.

दरम्यान, सर्व प्रश्नांवर संबंधित अधिका-यांना योग्य त्या सुचना आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिल्या असून त्या प्रश्नांवर योग्य उपाययोजना एका महिन्यात कार्यवाही करा, असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button