breaking-newsराष्ट्रिय

नऊ महिन्यांपूर्वी पळवलेला मोबाईल चालू करताच पोलीसांनी पकडले

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) – पळवलेला मोबाईल नऊ महिन्यानंतर चालू करताच पोलीसांना त्याचे लोकेशन मिळाले आणि त्यांनी मोबाईल चोराला अटक केली. बाईकस्वारांनी लोकांच्या हातातील मोबाईल पळवण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. ऑगस्ट 2017 मध्ये जिंदे नाला भागात बाईकस्वारांनी एकाच्या हातातील मोबाईल झडप घालून पळवला होता. त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती.

नऊ महिन्यांनंतर तो मोबाईल अचानक चालू झाला आणि त्याचे लोकेशन मिळताच मुद्देमालासह चोर पोलीसंच्या ताब्यात सापडला. मुनेश उर्फ मोनू सेंगर (23) असे चोराचे नाव असून पोलीस त्याचा साथीदार मोनू उर्फ बबलू भदेरियाच्या शोधात आहेत. चोरीसाठी वापरलेली बाईक पोलीसांनी जप्त केली आहे. त्याने केलेल्या इतर चोऱ्यांचा शोधही लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button