breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘द केरळा स्टोरी’ चित्रपटारून बागेश्वर बाबाचं मोठं विधान; म्हणाले..

मुंबई : ‘द केरळा स्टोरी’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घालत आहे. अनेकांनी या सिनेमाबाबत आपली मतं मांडली आहेत. या पार्श्वभूमीवर बागेश्वर धामचे पिठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, ‘द केरळा स्टोरी’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. ही देशाची सद्यस्थिती आहे आणि आपण सर्व हिंदू झोपेत आहोत. लोक समजून घेत नाही आहेत आणि मला म्हटलं जात की, मी प्रक्षोभक विधान करतो. आमचे शब्द प्रक्षोभक नाहीत, तर हिंदूंना जागो करण्यासाठी आहेत. जे घडले ते या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हे सर्व हिंदूंचे दुर्दैव आहे की, जोपर्यंत भारतीय प्रत्येक मंदिर हिंदूंना हे शिकवणार नाही की सनातन म्हणजे काय? हिंदू म्हणजे काय? तोपर्यंत अशा घटना घडत राहतील.

हेही वाचा – ‘सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे त्यांचे स्मारक व्हावे’; राज्यपाल रमेश बैस

दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाने १७ व्या दिवशी १९८ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने पहिल्यात आठवड्यात ३५ कोटींची कमाई केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button