breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेना पदाधिका-यांसाठी लोणावळ्यात ‘प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन

पिंपरी, (महाईन्यूज) – शिवसेना पक्षाच्या वतीने मावळ लोकसभा क्षेत्रातील पिंपरी-चिंचवड व मावळ विधानसभेतील पदाधिका-यांसाठी “शिवसेना पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर” आयोजित करण्यात येणार आहे. हे शिबिर लोणावळा येथील कार्ला येथे रविवारी (दि. 28) सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी दिली आहे.

या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी शिवसेना उपनेते रविंद्र  मिर्लेकर, संपर्क नेते बाळा कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबूकस्वार, शिवसेना महिला संपर्क नेत्या लतिका पास्ते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिबिरामध्ये विधानसभा २०१९ ते २०२२ पर्यंत होणार्‍या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी शिवसैनिकांनी सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी नियोजनबद्ध संघटनात्मक बांधणी,  पक्ष विस्तार होण्यासाठी व आपला शिवसैनिक सक्षम शिवसैनिक हे व्हिजन ठेऊन कार्यकर्त्यांना दिशा व मार्गदर्शन करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराची सुरुवात सकाळी ९ ते १० या वेळेत शिवसैनिक आरोग्य तपासणी शिबिराने होणार आहे. नंतर १० वाजता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये शिवसेना उपनेते व व्याख्याते नितिन बानगुडे पाटील यांचे संघटन हेच सामर्थ्य या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

दुसर्‍या सत्रामध्ये प्रा. पंकज महाराज गावडे यांचे चला बदलूया महाराष्ट्र घडवूया या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच, शेवटच्या तिसर्‍या सत्रात शिवसेना उपनेते रविंद्र  मिर्लेकर यांचे माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र अभियान व संघटनात्मक बांधणी संदर्भात शिवसैनिकांना मोलाचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी ३ वाजता समारोप होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button