breaking-newsपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी पाचजण घरी, डॉक्टरांनी दिला निरोप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना (कोबीड १९) या आजाराच्या सद्यस्थितीत दाखल एकुण पॉझिटिव्ह ९ रुग्णांपैकी नवीन भोसरी रुग्णालयातील ज्या रुग्णांचा १४ दिवसाचा कालावधी पुर्ण झाले आहे. अशा ५ रुग्णांचे २४ तासातील घशातील द्रव्याचे लागोपाठ दोन नमुन्याचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले.

त्यांना घरामध्ये १४ दिवस अलगीकरणामध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ४ आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांचेवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयांमधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बिषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची संख्या १४२५ असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भामल्यास पुढील २८ दिवसांपर्यंत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. तसेच, सुचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील १४ दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल, या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button