breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Interim Budget 2024 | राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर, महत्वाच्या घोषणा काय?

Maharashtra Interim Budget | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. कुसुमाग्रजांच्या कवितेचे वाचन करून अजित पवार यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात केली. पहिल्या चार महिन्यांसाठी तरतुद करण्यासाठी हा अंतरीम अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील ११ गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे :

  • महाराष्ट्राला यंदा वस्तू व सेवा कराच ८ हजार ६१८ कोटींचा परतावा मिळाला
  • महाराष्ट्रातील ११ गड-किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळावा, यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे
  • अटल सेतू व कोस्टल रोडला जोडण्यासाठी २ बोगद्यांचं बांधकाम हाती घेण्यात आलं आहे
  • नागपूर मिहान प्रकल्पाच्या भूसंपादन व इतर कामांकरिता १०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे
  • नवी मुंबई विमानतळाचं काम वेगाने सुरू असून पहिला टप्पा मार्च २०२४ पर्यंत कार्यान्वित होईल
  • ग्रामविकास विभागास ९२८० कोटी रुपये, गृह, परिवनहन, बंदरे विभागास – ४०९४ कोटी रुपये, सामान्य प्रशासन विभागास १४३२ कोटी रुपयांची तरतूद
  • मूर्तीजापूर-यवतमाळ रेल्वेमार्ग विस्तारीकरणासाठी ५० टक्के निधी
  • उद्योग विभागास १ हजार ०२१ कोटी तर सहकार विभागास १९५२ कोटींच्या निधीची तरतूद
  • पाणीपुरवठा व स्वच्छता विभागास ३८७५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
  • केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग व प्रकल्पांसाठी १५५५४ कोटींची तरतूद
  • शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना सुरू करण्यात येईल. यात ८ लाख ५० हजार नवे सौर कृषीपंप बसवण्यात येतील
  • वीज उपलब्ध नसलेल्या ३७ हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येतील
  • राज्य सरकारचं ७ हजार मेगावॅट ऊर्जानिर्मितीचं लक्ष्य
  • ऊर्जा विभागासाठी ११ हजार ९३४ कोटींच्या निधीची तरतूद
  • मदत व पुनर्वस प्रकल्पासाठी ६६८ कोटी रुपयांची तरतूद

हेही वाचा    –    ‘रेल्वे पायाभूत सुविधांमुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल’; शंकर जगताप 

  • विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी २ हजार कोटींची तरतूद
  • राज्यात ११ मोठे, ८ मध्यम व २९ लघु सिंचन प्रकल्पांची कामे चालू
  • महिलांना ‘पिंक रिक्षा’ उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवण्यात येत आहे
  • महिला व बाल कल्याण विकास विभागास ३१०७ कोटी रुपयांची तरतूद
  • राज्यातील सर्व कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब १ लाख ५० हजारांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे
  • गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळामार्फत उसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू करण्यात येत आहेआदिवासी
  • विकास विभागासाठी १५ हजार ३६० कोटींचा निधी प्रस्तावित
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी १८ हजार ८१६ कोटींचा निधी प्रस्तावित
  • राज्यातील अंगणवाडी सेविकांची १४ हजार रिक्त पदं भरण्यात आली
  • बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार
  • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत अनुदान २ लाखांवरून १० लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुदतकर्ज योजनांसाठी राज्य सरकारकडून देण्यात येणारी हमी ३० कोटींवरून ५०० कोटी करण्यात आली आहे
  • अयोध्या व श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय.
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत १० पट वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदकासाठी १ कोटी, रौप्य पदकासाठी ७५ लाख, कांस्य पदकासाठी ५० लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येतील
    क्रीडा विभागासाठी ५३७ कोटींच्या निधीची तरतूद
  • वरळीत आधुनिक कौशल्य विकास केंद्राची उभारणी केली जाणार
  • स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्ती वेतन प्रतीमाह १० हजार रुपयांवरून दुप्पट म्हणजे २० हजार रुपये करण्यात आले आहे
  • अर्थ विभागासाठी २०८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button