breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

धर्मा पाटील या शेतकऱ्याला मंत्रालयात आत्महत्या करावी लागली- राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

अहमदनगर: धर्मा पाटील या शेतकरी आजोबांना भाजप सरकारच्या काळात आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात आत्महत्या करावी लागलेली आहे. हे एक उदाहरण झालं,आज सुद्धा बिहार,उत्तरप्रदेश या भाजपशासित राज्यात बलात्कार,खून सारखे गुन्हे दिवसाढवळ्या घडत आहेत,सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलेलं जात आहे. अशा वेळी पीडितांना न्याय देण्याची साधी मागणी न करणारे भाजपचे नेते,कार्यकर्ते महाराष्ट्रात मात्र आक्रमक होतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला लगावलेला आहे.

https://www.facebook.com/RRPspeaks/?hc_ref=ARSUwVsZlJZljWtRiigjNgqIz1j0WFKjkrTL-UIcBrGL0Kl9VFhIinITESqOdCtRkPg&fref=nf&xts%5B0%5D=68.ARDvanqpBXiuvFxQcniWSZX2jN-tiLjupa5pfQHhXK4otsdDAvPc28eSZu-oyHw0a_jf2kXTam4eUYO8Qp6KNUUZA9viToYDPFFPkXM49JzZdmLb9iq6oRHu-J38JMmptODaN9S5dKoVVpGhbh4ZAv7pm2zXFp5tC5DXa6wLQDniVm643RbrZwjiGII_1wobSptuHver9-sPn8cT0ZbLfODSREvpIb4eUjYpISsi1Wu9RJoXjX-B2m7ucEhnrC_jNNbWqUqi6bcriWEsFEzY6p2pxqx9xjoIfTb7rn5-LdAeiG89nd6pBOuAecGsyz8i0CdaIHpGLOpu1rL-dV4IhQ&tn=kC-R

धर्मा पाटील या शेतकरी आजोबांना भाजप सरकारच्या काळात आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात आत्महत्या करावी लागली. हे एक उदाहरण झालं,आज सुद्धा बिहार,उत्तरप्रदेश या भाजपशासित राज्यात बलात्कार,खून सारखे गुन्हे दिवसाढवळ्या घडत आहेत,सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जात आहे. अशा वेळी पीडितांना न्याय देण्याची साधी मागणी न करणारे भाजपचे नेते,कार्यकर्ते महाराष्ट्रात मात्र आक्रमक होतात. आपलं महाविकास आघाडी सरकार हे न्यायाच्या बाजूने उभा राहणार सरकार आहे,मात्र काही लोकांचा दुर्दैवाने पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांचा उपयोग करून हे सरकार डळमळीत करण्यात रस आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण असो किंवा नागरिकाला झालेली मारहाण या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे. महाविकास आघाडीचा एक घटक आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या पीडितांना लवकर न्याय मिळावा अशीच माझी मागणी असते. वाईट याच वाटत की, अशा गोष्टी घडल्यानंतर ठरावीक लोक लगेचच राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करायला लागतात. बिहार निवडणूक जवळ येताच महाष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू झाले,आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहार मध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत. याआधी देखील राजकारणासाठी ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा’, ‘माझे अंगण,माझे रणांगण’ यासारखी राज्याचा अपमान करणारी आंदोलने भाजपने केलेली आहेत. त्यामुळेआता देखील बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत अस दिसतंय परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याच काम विरोधकांनी बंद करावं, महाराष्ट्रात त्यांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाहीय.

As the elections are nearing in Bihar, the opposition leaders have stooped to dirty politics. They are trying to portray a picture that there is injustice done to the people in Maharashtra and have been demanding for President’s rule to be imposed in the state. Unfortunately, the opposition is politicizing the issues, be it the case of Sushant Singh Rajput or citizen being beaten up, but the Maharashtra police have taken proper legal actions in these cases. But the BJP leaders have conveniently forgotten the situation of law and order in the states like Bihar and Uttar Pradesh, ruled by their Govt. Dharma Patil, an aged farmer was deprived of justice under the BJP Govt. earlier & committed suicide in the ministry office. Journalists who raise their voices against the Govt. in states like Bihar & UP are killed even today & crushed under cars. The same BJP leaders and activists who are now questioning the administration in Maharashtra have been mute spectators over such incidents in these states. I, as a citizen of Maharashtra and a member of #MVA Govt. demand for justice in these cases. BJP had started campaigns like ‘Kuthe Nevun Thevala Ahe Maharashtra Majha’ & ‘Maze Aangan Maze Ranangan’ to defame the Maharashtra Govt. earlier as well. The opposition should stop targeting the Maharashtra Govt. by using the emotions of the victims for their political benefits. The people of Maharashtra are wise and very well understand the ‘pattern’ of opposition. They will never allow them to succeed in their motive.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button