breaking-newsपिंपरी / चिंचवड

बालेवाडीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, रहाटणीत निवड चाचणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ६३ वे अधिवेशन आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जानेवारी २०२० मध्ये बालेवाडी येथे मंगळवारी (दि. 24) होणार आहेत.

या स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड परिसरातील कुस्तीगीरांची निवड चाचणी मंगळवारी (दि. २४) रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे होणार आहे. निवड स्पर्धेचे आयोजक व ड प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप भानुदास नखाते आणि पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविली आहे.

या स्पर्धेचा उद्‌घाटन समारंभ मंगळवारी दुपारी ३ वाजता, तर बक्षीस समारंभ रात्री ३ वाजता होणार आहे. कुस्तीगीरांची वजने मंगळवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत घेतली जातील. स्पर्धा कुमार गट, माती गट व गादी गटात होईल. कुमार वजनी गट ४५, ४८, ५१, ५५, ६०, ६५, ७१, ८०, ९२, ११० तर महाराष्ट्र केसरी वजनी गट ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७, १२५ असा राहील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button