breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्र हे सर्वात जास्त कोरोना चाचण्या करणारं राज्य- आरोग्यमंत्री राजेश टोपे
करोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात जास्त आहेत कारण महाराष्ट्रात चाचण्या सर्वाधिक होत आहेत. ७० टक्के पॉझिटिव्ह रुग्ण यांची प्रकृती चांगली आहे. ५ टक्के रुग्णांची अवस्था ही थोडी चिंताजनक आहे. लॉकडाउन वाढवण्यात आला आहे याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या काळात शिस्त पाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे नाहीतर हा कालावाधी आणखी वाढू शकतो असंही राजेश टोपे यांनी दिलं. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे झोन तयार केले जातील असेही संकेत राजेश टोपे यांनी दिले.