breaking-newsताज्या घडामोडी

धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे

औरंगाबाद | मी कधीच माझी भूमिका बदललेली नाही. पाकिस्तानी कलाकारांना विरोध हा पूर्वीपासूनच होता. त्यांना हाकलून देण्यातही आमचीच भूमिका महत्त्वाची होती. मशिदीवरील भोंगे बंद केले पाहिजेत हा मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करतोय. जे स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणत होते. त्यांनीतरी असे कधी केले आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. आम्ही फक्त झेंडा बदलला आहे. आमची भूमिका तीच कायम आहे.

राजकारणात झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी आम्ही काही केलेले नाही, असे स्पष्ट करत धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते औरंगाबाद येथे बोलत होते. पक्षाचे धोरण आणि झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे हे प्रथमच मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत.

आम्ही कधीच भूमिका बदललेली नाही. अनेक जण तर आपापल्या भूमिका बदलून सत्तेसाठी एकत्र आले आहेत, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. तसेच मला हिंदू जननायक म्हणू नका, असेही त्यांनी यावेळी म्हटले. औरंगाबादचे नाव बदलले तर काय हरकत आहे. चांगले बदल झालेच पाहिजेत, असे म्हणत त्यांनी औरंगाबादच्या नामांतराला पाठिंबा दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button