breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धर्मवीर संभाजी महाराज जयंती दिवशी शासकीय सुट्टी घोषीत करा, युवासेनेची मागणी

पिंपरी, (महाईन्यूज) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिवशी शासकीय सुट्टी घोषीत करावी, अशी मागणी पिंपरी विधानसभा मतदार संघातील युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे.

यासंदर्भात युवा सेनेतर्फे आकुर्डी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार विकी परदेशी यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन हे भारतीय युवकांसाठी प्रेरणादायक आहे. संभाजीराजे यांचे बलिदान पुढील पिढ्यांना स्फुर्ती देत रहावे, यासाठी धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्मदिवस हा शासकीय सुट्टी म्हणून घोषीत करण्यात यावा. त्या दिवशी विविध ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन केले जावे, अशी मागणी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

निवेदन देताना युवासेनेचे मावळ तालुका प्रमुख अनिकेत घुले, जिल्हा समन्वयक रुपेश कदम, युवती सेना अधिकारी प्रतिक्षा घुले, अभिजीत गोफण, विभाग संघटक निलेश हाके, विभागप्रमुख राजेश वाबळे, विभाग संघटिका कामिनी शर्मा, शाखा संघटिका कल्पना जाधव, उपयुवा अधिकारी राहुल पलांडे, मावळ युवासेना उपविभागीय अधिकारी अक्षय येळवंडे, ओंकार जगदाळे, ऍड. अजित बोराडे, सनी कड, राहुल राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाकडे या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी  लवकरच  आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याविषयी निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती प्रतिपादन प्रतिक्षा घुले व निलेश हाके यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button