breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत १५ हजार ऑक्सिजन खाटांची सज्जता, अतिरिक्त आयुक्त काकाणी

मुंबई – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेने ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही, याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांसाठी सर्व प्रकारची व्यवस्था पालिकेने केली आहे. जवळपास 30 हजार खाटांची तयारी ठेवली असून १५ हजार ऑक्सिजन खाटा तर अतिदक्षता विभागात ४ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले

सुरेश काकाणी म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी उडालेली धावपळ लक्षात घेऊन ऑक्सिजन वापराच्या नियोजनासह ऑक्सिजन उपलब्धतेचा विचार करण्यात आला आहे. पालिकेच्या दोन रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार असून दोन रिफिलिंग सेंटरही सुरु करण्यात येणार आहेत.ऑक्सिजन वापराबाबत रुग्णालयांच्या रुग्ण क्षमतेचा विचार करून नियोजन करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयात ज्या संस्थांकडून ऑक्सिजन घेतला जातो, त्यांच्याशी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी करार करण्यास सांगितले आहे. यामागे संबंधित संस्थांना करारानुसार ऑक्सिजन पुरवठा बंधनकारक राहिल याचा विचार करण्यात आला असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button