breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

धक्कादायक! मित्राच्या डोळ्यांदेखत तरुणीला उचलून नेलं, 2 नराधमांनी केला बलात्कार

औरंगाबाद: राज्यात कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असलं तरी यादरम्यान गुन्ह्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत. आताही बलात्काराची धक्कादायक घटना औरंगाबादमधून समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीला उचलून नेत दोन अज्ञात नराधमांनी बेदम मारहाण करत तिच्यावर बलात्कार केलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरलेला आहे. भर दिवसा असा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भांगसीमाता गडाजवळील डोंगरातील ही धक्कादायक घटना घडलेली आहे. लॉकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर जाण्यासाठी परवाणगी नाही आहे. अशात कोरोनाच्या वाढता संसर्ग रोखण्यासाठी पिकनिक स्पॉट आणि पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात आलेली आहे. तरीही आताची तरुणाई नियम मोडत फिरण्यासाठी बाहेर पडते आहे. अशात तरुणी तिच्या मित्रांसोबत भांगसीमाता गडाजवळील डोंगरात फिरण्यासाठी गेली असता ही भयानक घटना घडल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

पीडित तरुणी तिच्या मित्रांसमोर फिरायला गेली होती. यावेळी काही अज्ञात तरुण तिथे आले आणि त्यांनी सगळ्यांना मारहाण करत मित्रांसमोरून उचलून नेत तरुणीवर बलात्कार केला आहे. यावेळी तरुणीला देखील मारहाण करण्यात आल्याची माहिती तक्रारीमध्ये देण्यात आलेली आहे. आरोपी नराधमांनी तरुणीला जवळच्या खड्ड्यात नेलं. तेव्हा मुलगी प्रचंड विकळाली. गयावया करत हात जोडले. पण, नराधानाने तिचं काहीही न ऐकता तिच्यावर अत्याचार केले आहेत. दरम्यान, दोन्ही आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आहे. ही खळबळजनक घटना सायंकाळी साडेसहा वाजता भागतीमाता गडाच्या जंगलात घडली. या प्रकरणी दौलताबाद ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस घटनेचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button