breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सावधान! सांगलीला पुराचा धोका, कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ

सांगली: जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सांगली जवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २० फूट इतकी झालेली आहे. त्यामुळे सांगलीत पुराचा धोका कायम आहे. दरम्यान, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वारणा धरण ८१ टक्के भरलेले आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वारणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ चालली होत आहे.

वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, काखे मांगले आणि कोकरूड रेठरे पुल पाण्याखाली गेलेले आहेत. पावसाचा जोर जर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला जाऊ शकतो, त्यामुळे वारणा नदी काठच्या ग्रामस्थांनी सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button