breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

धक्कादायक! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून अपहरणकर्त्याच्या भावावरच चॉपरनं केले सपासप वार

डोंबिवली: बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून अपहरणकर्त्याच्या भावावर चॉपरने सपासप वार केल्याची घटना समोर आलेली आहे. फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी 24 तासांत अटक केलेली आहे. डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राहुल बलबहादुर सोनार (20, रा. समतानगर झोपडपट्टी) असे हल्लेखोराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून धारदार चॉपर हस्तगत केलेला आहे.

डोंबिवली पूर्वेतील कोपर ब्रिजजवळ असलेल्या महाडीक निवासमध्ये राहणारा करण शंकर महाडीक (29) हा तरुण चॉपर हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राहुल याची 22 वर्षीय बहीण निशा हिचे करण महाडीक याचा भाऊ मनीष याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, या दोघांच्या प्रेमसंबंधाला निशा सोनार हिच्या घरातून विरोध होता. तरीही हे दोघे प्रेमी सोमवारी 27 जुलै रोजी सकाळी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घरातून पळून गेले होते. वर्क फॉर्म होमचे काम असल्यानं करण महाडीक हा आई उर्मिला, बहीण वैशाली यांच्यासह घरी असताना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दोन महिला व एक मुलगा महाडीक घराबाहेर आले होते. यावेळी आरोपींनी माझ्या बहिणीला आवाज देऊन तुझा भाऊ मनीष कुठे आहे, असं विचारलं. तेव्हा वैशाली तुम्ही कोण म्हणून विचारले असता त्यांनी काजल आणि दीपा असं नाव सांगितलं. तसेच सोबतच्या मुलाने राहुल सोनार असे नाव सांगून तुझ्या भावाने माझी बहीण निशा हिला पळवून नेले आहे. तो कुठे आहे ? असे विचारु लागला. तेव्हा करण व त्याच्या आईने सदर तिघांना आम्हाला माहीत नाही, असे सांगितले. यावर काजल आणि दीपा हिने आई व बहिणीला शिवीगाळी केली व त्यांच्याशी झटापट करु लागलेल्या पाहून करण झटापट सोडविण्यास गेला असता राहुल सोनार याने ठोशा-बुक्याने मारहाण केली होती. त्यानंतर पिसाळलेल्या राहुल सोनार याने कमरेला खोचलेला चॉपर उपसून करण महाडीक याच्या मान, गाल, डोके व पोटावर सपासप वार केले आहेत.

रक्तबंबाळ होऊन करण कोसळल्याचे पाहून हल्लेखोर राहुल सोनार याने तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत करणला त्याच्या बहीण व आईने तात्काळ रिक्षात टाकून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. दुसरीकडे पोलिसांनी फरार हल्लेखोरांच्या विरोधात जखमी करण महाडीक याने दिलेल्या जबानीवरून भादंवि कलम 307, 323, 504, सह भारतीय हत्यार कायदा 4 /25 अन्वये गुन्हा दाखल केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button