breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

#CoronaVirus: पुणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांकडून खासदार अमोल कोल्हेंची विशेष दखल, औषधांच्या काळाबाजारावर कोल्हेंकडून जालीम उपाय

पुणे: वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याचा दौरा करत आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या खासदार अमोल कोल्हे यांची विशेष दखल घेतली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांची मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाणीवपूर्वक दखल घेतली आहे. त्यांनी 3-4 वेळा डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा आवर्जून उल्लेख केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांच्यातील नात्याचं अनोखं रुप येथे पाहायला मिळालेलं आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, “पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत चालले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीतजास्त बेड उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यात उपलब्ध करुन द्यावे. अनेकदा डॅशबोर्डवर खाटांची उपलब्धता दिसते, मात्र प्रत्यक्षात तेथे रुग्ण पोहोचतो तेव्हा खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. परिणामी रुग्णांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे डॅशबोर्ड सातत्याने अपडेट करावेत.”

“मुंबईत कोरोना नियंत्रणात आलेला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांसाठी बेडची सुविधा निर्माण केलेल्या रेल्वे बोगी, व्हेंटिलेटरसह विविध इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यात उपलब्ध करून द्यावेत. पुण्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना रुग्णांना आवश्यक औषधं उपलब्ध व्हावीत. विशेषतः रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर आणि टॉसिलीझुमाब या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी सरसकट या औषधाचा वापर करु नये. त्याऐवजी रुग्णाला खरोखरच त्याची गरज आहे का याची खात्री करुनच या औषधांचा वापर करण्यात यावा. यातून या औषधांचा काळाबाजार होण्यावर नियंत्रण ठेवता येईल,” अशी सूचना डॉ. कोल्हे यांनी केली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडलेल्या या सूचनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत आवर्जून दखल घेतली. त्यांनी या बैठकीत 3-4 वेळा डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा आवर्जून उल्लेख केला आहे. तसेच कोल्हे यांनी सुचवल्याप्रमाणे कोरोनाचा डॅशबोर्ड सातत्याने अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बोलताना अनेकदा खासदार कोल्हे यांना आपण स्वत: डॉक्टर आहात त्यामुळे आपल्याला हे समजू शकेल असं म्हटलेलं आहे. ही बाब उपस्थितांच्याही लक्षात आली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांच्या चांगल्या संबधांचीही चर्चा सुरु झालेली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तामामा भरणे आणि जिल्ह्यातील खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button